मज्जा सुट्टीतली...
मज्जा सुट्टीतली...
1 min
154
मज्जा सुट्टीतली
सुट्टी लागली शाळेला
आजोळी जाऊया चला
दोस्तासंगे शेताशिवारात
मनसोक्त भटकुया जरा...
नदीच्या गार गार पाण्यात
डुबक्या मारुन पोहुया
एकमेकांना भिजवुन भिजुन
मज्जाज मज्जा करुया
लगोरी, लपंडाव ,पकडापकडी
हुतूतू खुप खेळ खेळुया
आंबे ,जांभुळ, फणस खाऊनी
गावच्या किल्ल्यावर चढुया
सारं विसरुन जाऊ
अन् भरभरुन जगुन घेऊया
सुट्टी संपूच नये लवकर
बाप्पाकडे हे एकच मागणे मागुया
