STORYMIRROR

Poonam Wankar ( पूरवा )

Others

3  

Poonam Wankar ( पूरवा )

Others

मितवा

मितवा

1 min
223

एक मित्र असावा

ज्याच्या खांद्यावर

डोकं ठेवून रडता यावं

गोठलेल्या आसवांना जिथं

मनसोक्त गळता यावं..

एक मित्र असावा.. जो

न बोलताही समजून घेईल

आयुष्याची परीक्षा लिहिताना

न मागता कॉपी पुरवील..

एक मित्र असा

जो मैत्रीच्या पलिकडे

प्रेमाच्या थोड अलीकडे रहावा

सुख दुःखाच्या वाटेवरती

जन्मभराचा तो मितवा व्हावा..


Rate this content
Log in