मिठीत तुझ्या
मिठीत तुझ्या
1 min
251
मिठीत तुझ्या पून्हा एकदा
नदी किणारी तुला बिलगुणी
निसर्गाचा करुनी टेबल
नभाचा पसरवोनी चादर
चांदण्याना बनवुनी कँडल
पक्षांच्या मंजुळ स्वरात
ऐकत ती मधुर गाणी
करुयात का रे परत एकदा
कँडल लाईट डिनर
गवतावरती मऊ गादिचा भास होती
खांद्याचा तुझा माझ्यासाठी
करुन मकमली ऊशी
खुशीत मला घेऊन तुझ्या
दवबिंदुच्या स्पर्शाने
फुल मोगरा फेके अत्तर
स्वपनात मला नेशील का
तुझी आहे मी राधा बावरी
तु कृष्ण कन्हैया होशील का
