मित्रत्व / नातं मैत्रीच
मित्रत्व / नातं मैत्रीच
1 min
362
मित्रत्वाचा धागा सुंदर
गुंफून होतो हार
वसा त्यातला एक उकलता
हृदयाचे खुलते दार
या धाग्याचे रंग अनोखे
खजिल होतो इंद्रधनू
रंग तयाचा जरा छिडकता
क्षणात पान्हावते धेनू
जरी दिव्यातली वात सानुली
अंधार पळतो पार
अन् तुक्याचा अभंग होते
त्याच सुताची तार
निसर्ग तोही मित्र आपुला
सर्व गुरुंचा सार
आभाळाची संगत धरता
विवेक फुलतो फार
असे असावेत सखे सोबती
मित्रत्वाचे नाते
एक दुजाचा श्वास बनता
संकट लागते कोते
