मित्रमैत्रिणी
मित्रमैत्रिणी
1 min
201
संपला आजचा दिवस गप्पांच्या ओघात
मित्र अन् मैत्रिणींच्या मजा मस्करीत
समजलेच नाही कसे गेले क्षण अवचित
जणू मंतरलेल्या त्या मग्न गुजगोष्टीत
खरेच किती मजा आली आज
गोतावळा मित्रमैत्रिणींचा जमला आज खास
इतक्या दिवसांच्या त्या गप्पा
संपलेला दुरावा आमच्यातील आज खास
आयुष्यातील हे क्षण ठेवावे वाटतात कुपीत
जपूनजपून पुरवावेत आयुष्यभरासाठी
कारण आजच्या या धावपळीच्या युगात
नाही ओ कुणालाच वेळ कुणासाठी
मित्रमैत्रिणी हव्या असतात हक्काच्या
सुखदुःखाच्या गोष्टी विणण्यासाठी
रक्ताचीही नाती फिरवतात पाठ
मात्र सदैव मैत्रीचेच नाते असते आपल्यासाठी
