STORYMIRROR

Umesh Salunke

Others

3  

Umesh Salunke

Others

मित्राच्या लग्नात भेटलं एक

मित्राच्या लग्नात भेटलं एक

1 min
223

मित्राच्या लग्नात भेटलं एक पाखरु ग

आता प्रश्न पडला तिला कस विचारू ग.....!


सगळी सुरू झाली होती गडबड

माझ्या मनात सुरू झाली होती विचारांची बडबड

मित्राच्या सोबत थांबून डोळ्यांच्या पापणीची फडफड

 कधी थांबलं माझ्या हृदयाची धडधड

तुला भेटण्यासाठी सगळी करतोय धडपड ग......!


सगळी कामे सोडून द्यावी तुला भेटावं ग

मला तुला कांही तरी सांगू वाटतंय ग 

माझ्या लक्षात असं आलंय ग 

तु नजर चुकवून मला बघून न बघितल्यागत करतीय ग.....


पहिल्या क्षणात तुला काय बोलावं

 मला हया गर्दीत सुचेना ग.

तुझं नावं काय हे कसं विचारावं ग

 मला तुझ्या प्रेमात पडावं असं वाटतंय ग......!


मित्राच्या लग्नात आपल्या दोघांच्या डोहिवर 

 अक्षदा पडाव्या असं मला सारखं सतावतय ग

 तुझ्या वर माझा जीव तुळतळ करतोय ग......


जेवणाच्या पंगतीत आपण एकमेकांना घास भरवु ग

  आपला फोटो काढून आपल्या अलब्म मध्ये आठवण राहील ग......!


एक होता कलवरा 

 एक होती कलवरी

 शेवटी झाली कावरी बावरी........!

  नेली त्याने पळुवून घरीं

  

मित्राच्या लग्नात भेटलं एक पाखरु ग

आता प्रश्न पडला तिला कस विचारू ग.....!



Rate this content
Log in