मित्र......!
मित्र......!
1 min
341
सुख दुःखात वाहे तो
वार्यासारखा....२
मित्र उन्हाच्या झळांत पावसासारखा....||धृ||
दोष, चुकांची ती वाट
कळेल तुला रे...२
जोवरी मित्र आहे तुझा
आरशासारखा
मित्र....१
आत्मबळ, संयमाचा
दिलासा जिथे..२
सोबती आहे तो,
श्वासासारखा
मित्र....२
वेदनेचे मलम तो
दवा आपुला...२
हृदयी तो असावा
मनासारखा
मित्र....३
जीवाभावाची नाती
रक्ताहून निराळी....२
रंग तू सुगंध तो
फुलासारखा
मित्र....४
मैत्री ही वात्सल्याच्या
जननी समान
घे कुशीत, मिठीत
आईसारखा
मित्र....५
