मित्र विठ्ठल, देव विठ्ठल
मित्र विठ्ठल, देव विठ्ठल
मित्रांसोबत क्षण गेला, दिवसही गेला,
आषाढी वारी होती, भगवी पताका चमकत होती,
वाळवंटात, चंद्रभागेचे स्नान केले,
दर्शनबारीस गोपाळपूर गाठले,
मित्र विठ्ठल बरोबर होता,
विटेवरचा विठ्ठल विटेवर होता
टाळ मृदंग जयघोष होता,
बारी आम्ही थांबून गेलो,
विठ्ठल, विठ्ठल बोलत गेलो,
२२ तासांची बारी झाली,
विठ्ठल चरणी मस्तक टेकविले,
उभे विठ्ठल विटेवर पाहिले
संत तुकाराम म्हणाले,
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी,
ते आज नेत्र भरुन पाहिले,
माझ्या मित्रासंगे
असा विठ्ठल प्रसन्न,
आनंद घननीळ,
पाहिला पाहिला.
विठ्ठल कृपे
एक विठ्ठल विटेवर,
एक सोबत माझ्या,
असा दिवस छान,
क्षणासारखा गेला,
आज मी विठ्ठल पाहिला
