मित्र म्हणजे
मित्र म्हणजे
1 min
353
मित्र म्हणजे वैरी तुमच्या दुःखांचा
मित्र म्हणजे सोबती तुमच्या सुखांचा
आजकाल मित्रांचे फोन पैशासाठी येतात
नाही बोललो तर रागावून ठेवतात
जिवलग कोण हे सांगणे कठीण
मैत्रीची शपथ घालून उसने घेत राहतात
दिले की फोन नाही
काम झाल की तू कोण आहे
मतलबासाठी मैत्री कशाला
जीवाभावाचे आहात मग भिती कशाला
पैशापेक्षा मित्र प्यारा असावा
त्याच्या सहनशक्तीचा अंत न पाहावा
अतूट नातं आहे ते त्याला जपावा
मित्र म्हणजे वैरी तूमच्या दुःखांचा
मित्र म्हणजे सोबती तुमच्या सुखांचा
पाठीवर कशाला वार करता
छातीवर करा कारण
जिवलग आहे तो तुमचा
