मिथुन राशी
मिथुन राशी
1 min
258
कुतूहल असतं गोष्टींचं
प्रश्न यांना बरेच पडती
तर्कबुद्धीचे मिथुन
गहन विचार करती
हजरजबाबी अन् बुद्धिमान
राहतात नेहमीच आनंदी
मज्जा मज्जा करत जगतात
माणसं मिथुन राशीची
स्थिर कधी बसत नाही
सदैव चंचल वृत्ती राही
गप्पा-गोष्टींमध्ये रमते
अशी ही मिथुन राशी
कितीही बोललं तरी
थकत नाही यांची वाणी
चातुर्याने आपला हेतू
साधते मिथुन राशी
