STORYMIRROR

Pandit Warade

Others

3  

Pandit Warade

Others

मीच अर्धांगिनी

मीच अर्धांगिनी

1 min
174

सहचारिणी मी, मीच अर्धांगिनी

मनमोहनाची, लाडकी कामिनी

धर्म, अर्थ, काम, मोक्ष, पुरुषार्थ 

सोबत  देणारी  उत्तर दायिनी ।।१।।


जन्मदाते माय बाप आप्त सारे

घरदार, बंधू, भगिनी  सोडले

देव, अग्नी, गणगोत बोलावून

भुदेवाच्या साक्षीने नाते जोडले ।।२।।


सप्तपदी झाली कन्यादान झाले

सोडले माहेर, सासरी निघाले

नाचले, बागडले ज्या अंगणात

त्याच अंगणी आज पाहुणी झाले ।।३।।


सन्मान वाढवते यजमानाचा

मान यथायोग्य होई अतिथीचा

संकटात धीर देते नवऱ्याला

निभावते खरा धर्म गृहिणीचा ।।४।।


संसाराचा गाडा ओढते नेटाने

लावते खांद्यास खांदा संगतीने

कधी वित्तासाठी कष्टही सोसते

संसाराला  हातभार आवडीने ।।५।।


सदा सुखी ठेव देवा मालकाला

ईश्वराच्या चरणी हीच मागणी

मिळो हाच पती जन्मजन्मांतरी

होऊ दे मला तयाची अर्धांगिनी ।।६।।


Rate this content
Log in