मी
मी
1 min
228
नाव माझे नूतन
स्वभाव माझा शांत!
मनावेगळे झाले तर मी होते अशांत!
जिद्दी आणि धाडसी
माझ्या स्वभावाचे अनेक पैलू!
सातत्य आणि परिश्रम
सुख कसे झेलू!
छंद जोपासले अनेक
धडपड सतत काहीतरी करण्याची!
लेखनीही सोबती
नाविन्य जीवनात आणण्याची!
सौदर्याची आवड मला
जग सुंदर भासे मला!
सकारत्मक विचारसरणी
तमा मला जगाची कशाला!
माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे
हे ब्रीदवाक्य माझे!
जिवनात आनंद मिळवणे
हेच स्वप्न माझे!
