मी
मी
मी अशीच आहे
फारच भोळी
विश्वास ठेवणारी.....
मी अशीच आहे
दुसर्याच्या दुःखात
आश्रू ढाळणारी....
मी अशीच आहे
अती सहनशील पण
एकांतात रडणारी...
मी अशीच आहे
स्वतःचे दुःख जनाला
न सांगणारी....
मी अशीच आहे
माझा स्वाभीमान
जपणारी.....
मी अशीच आहे
भावनांमधे सदैव
वाहत जाणारी....
मी अशीच आहे
जिवन संघर्षात
हार न मानणारी....
मी अशीच आहे
पतीच्या आजारपणात
खंबीर उभी राहणारी.....
मी अशीच आहे
कोणी टोमणे मारले तरी
राग न धरणारी....
मी अशीच आहे
राग लोभ नको जनावरी
सदैव मी हसरी.....
मी अशीच आहे
कविता ,चारोळी करत
एकांती रमणारी.....
मी अशीच आहे
सावित्री वैभवची प्रेमळ
संकटी त्यास वाचवणारी.....
मी अशीच आहे
संपूर्ण कुटुंबावर नितांत
प्रेम,माया करणारी......
