मी येऊ का.....
मी येऊ का.....
1 min
418
मी येऊ का सांजेचे रंग उधळण्यासाठी
मी येऊ का क्षितिजावरचे रंग मोजण्यासाठी
मी येऊ का मखमली पावलांनी पैंजण रुणझुणवत
मी येऊ का रातराणीच्या कळ्यांना खुणवत
मी येऊ का स्वप्नात या चांदण्या राती
मी येऊ का मंद वाऱ्याच्या लहरीवरती
मी येऊ का चांदीच्या पंखावरुन नदीकाठी
मी येऊ का अंगणी चांदण फुले वेचण्यासाठी
मी जाईन दव भिजल्या गवतावरुन
मी जाईन पहाटेच्या थिजल्या वाटेवरुन
मी जाईन पुन्हा ना येता परतुन
मी जाईन तो एक क्षण मिळता ओंजळ भरुन!
