मी उत्तर देऊ शकणार नाही
मी उत्तर देऊ शकणार नाही
मी कसा आहे हे तुला मी सांगु शकणार नाही,
तुझ्या कोणत्याही प्रश्नाचे मी उत्तर देऊ शकणार नाही.
पडतील तुला असे असंख्य प्रश्न रोजच नवे,
की का तुझ्या प्रश्नांची मी उत्तर देऊ शकणार नाही.
आहेत माझे काही वैयक्तिक निर्णय घेतलेले,
ज्यामुळे कधीच तुला मी उत्तर देऊ शकणार नाही.
नाही वाटत गरज मला तुला सार काही सांगण्याची,
कदाचित् त्यामुळेच तुला मी उत्तर देऊ शकणार नाही.
नको वाटून घेऊ वाईट माझ्या बोलण्याचे कधी,
का तुझ्या काही प्रश्नांचे मी उत्तर देऊ शकणार नाही.
कारण प्रश्नच तुझ्या विरोधातली आहेत सारी,
म्हणुनच तुझ्या कोणत्याही प्रश्नाचे मी उत्तर देऊ शकणार नाही.
