STORYMIRROR

Neha Khedkar

Others

4  

Neha Khedkar

Others

मी थकले आता फार..!

मी थकले आता फार..!

1 min
183

शाळा नसली तरी 

सकाळी सहाला व्यायामाची वेळ होते

नवऱ्याला डबा द्यायचा म्हणून 

अजूनच धावपळ होते.

कधी तरी निवांत झोप घ्यायला मी आहे तयार

मी थकले आता फार

मला ब्रेक हवाय, मला ब्रेक हवाय..यार..!


सकाळी उठून स्वयंपाकात 

भाजीपाल्याची बोंब असते

अश्या वेळी आपल्या 

पाककलेची खरी परीक्षा असते.

" तू काहीही कर, आम्ही खाऊ .." म्हणून

सगळेच भार देऊन होतात पसार

मी थकले आता फार

मला ब्रेक हवाय, मला ब्रेक हवाय..यार..!


काहीही करा, भांड्याचा ढिग

हळूहळू वाढतच असतो

त्याला बघूनच जीव आता

कासाविस होत असतो

अश्या वेळी काम वाल्या मावशींची

आठवण येऊन होते बेजार

मी थकले आता फार

मला ब्रेक हवाय, मला ब्रेक हवाय..यार..!


सगळं काही आवरुन जरा 

निवांत पडते तर

" मला भूक लागली " म्हणून

मुलगी डोळ्यासमोर हजर.

अश्या वेळी जावेने हातात दिलेल्या

चहाची आठवण येते फार 

मी थकले आता फार

मला ब्रेक हवाय, मला ब्रेक हवाय..यार..!


रोजच आपल्या हातानी 

बनवून खाऊन 

"जिभेवर चविष्ट काहीच लागत नाही

मला माहेरी जायचंय " म्हणून 

आता उपयोग काही नाही..

मला परत टवटवीत करणारं

टॉनिक "माझे माहेर "हवंय यार

मी थकले आता फार

मला ब्रेक हवाय, मला ब्रेक हवाय..यार..!


बघता बघता वर्ष 

निघून जात असतं

मुलांच्या परीक्षा संपताच 

आईच्या कुशीत जायला 

मन व्याकूळ होत असतं

यंदा विडिओ कॉल वरूनच

बहिण भावांच्या भेटी गाठी बघून

मी थकले आता फार

मला ब्रेक हवाय, मला ब्रेक हवाय..यार..!


Rate this content
Log in