STORYMIRROR

Manisha Awekar

Others

4  

Manisha Awekar

Others

मी सत्यप्रेमी

मी सत्यप्रेमी

1 min
212

 पत्रकार मी निर्भिड

आहे तसाच निर्भय

सत्य आणतो पुढती

मज ना जीवाचे भय   (१)


कधी हो चक्रीवादळ

घाले सागर थैमान

तशातही असे पुढे

छत्रीमधे घाली मान    (२)


कधी कोणी प्रश्न टाळी

कोणी दुरुत्तरे देई

उभा वाहिनीपुढती

ध्येय हे कर्तव्यपूर्ती    (३)


मज ना ठाऊक पक्ष

 ठावे ना राजकारण

सत्यवाली पत्रकार 

नित्य मनी ठेवी जाण  (४)


टीका समीक्षा कडक

नातीगोती बिघडती

परिचित चुकवती

सत्याचीच रणनिती    (५)


सदा फिरती पाऊले

सत्य छुपे शोधताना

जातीचाच समीक्षक

धार शब्दांना देताना     (६)


साहित्याला गुण द्या
लॉग इन