मी शिवरायांचा किल्ला बोलतोय
मी शिवरायांचा किल्ला बोलतोय
1 min
255
भगवा अंगाखांद्यावर खेळतोय
मी शिवरायांचा किल्ला बोलतोय ॥धृ॥
मी शौर्याचा पराक्रमाचा साक्षीदार
मी सह्य़ाद्रीचा महाराष्ट्राचा शिलेदार
इतिहास मराठ्यांचा सांगतोय
मी शिवरायांचा किल्ला बोलतोय ॥1॥
घ्या भरून इथली वीरत्वाची हवा
रोजचाच तुमचा दिवस असेल नवा
जपा आम्हाला वचन मागतोय
मी शिवरायांचा किल्ला बोलतोय ॥2॥
हे नसे पर्यटन अमोल आहे ठेवा
शौर्य बलिदान त्याग आदर्श यातूनी घ्यावा
चरणी शिवप्रभूच्या माथा ठेवतोय
मी शिवरायांचा किल्ला बोलतोय ॥3॥
