STORYMIRROR

Samiksha Jamkhedkar

Others

3  

Samiksha Jamkhedkar

Others

मी शाळा बोलते🙏

मी शाळा बोलते🙏

1 min
195

कसे आहात बाळांनो

माझ्या लेकरानो

चिमुकल्या पिलानो

मला तुमची खूप आठवण येते।

सकाळी आवरून सावरून तुम्ही शाळेत यायचा।

तुमच्या चिमुकल्या पायांचा स्पर्श मला व्हायचा।

राष्ट्रगीताने झालेली तुमची सुरुवात,प्रार्थना,

तुमचे देखणे रूप,शाळा भरल्याची घंटा नाद

सगळ सगळ डोळ्यासमोर येत।

आणि तुमच्या आठवणीनं मन चिंब भिजून जात।

तुम्ही नेहमी माझ्यावर निबंध लिहायचा माझी शाळा

आता मला माझे हरवलेले विद्यार्थी असा निबंध लिहायची वेळ आली।

माझ्या हुशार विद्यार्थ्यानो मी तुमची रोज आठवण काढते

आणि एकटीच ढसा ढसा रडते।

आपले नातेच असे आहे लहानपणापासून लागतो तुम्हाला माझा लळा।

ती असते तुमची शाळा।

रडत रडत येणारे तुम्ही माझ्या ज्ञान भांडारातून जातांना

अनमोल ज्ञान घेऊन दहावी नंतर हसत हसत बाहेर पडतांना

तेंव्हा आनंद तितकाच होतोआणि दुःख याचे की तुम्ही मला सोडून जाणार।

तुम्ही जाता दुसरे नविन विद्यार्थी येता ही साखळी अशीच चालू राहते।

सकाळी तुमची रोज आठवण मी काढते।

दिवसभर दारात एकटीच बसून

पिलानो तुमची वाट मी बघते ।

पिलानो तुमची वाट मी बघते।


Rate this content
Log in