मी सागर अथांग
मी सागर अथांग
1 min
217
कुठे गोड कुठे खारट बदलत असते माझी चव
लोकं मात्र मलाच म्हणतात बेचव
मी जाणत नाही गुंड साधू संत
मी मानत नाही धर्म जाती पंथ
जपून वापरा मला मानावांनो
मी प्रत्येकाची भागवतो तहान
माझ्या उदरातील जल आहे
पृथ्वीवरील अमूल्य अमृत महान
कधी बनतो मी मायेच्या अश्रूंचा झरा
माझ्यामुळेच बरस्तात इथे पावसाच्या धारा
विश्वातील पाऊण भाग राहिलोय जरी मी व्यापून
तरी कदर करा आणि वापरा मला जपून
जन्माची जाणीव होऊन फेडा विधात्याचे पांग
एवढीच विनवणी माझी जरी मी सागर अथांग
जरी मी सागर अथांग
जरी मी सागर अथांग
