मी पाहिले
मी पाहिले
मी पाहिले
भाऊ-भाऊ एकत्र नांदताना
स्वार्थासाठी एकमेकांंचे गळे दाबताना
मी पाहिले,
एकीकडे संपन्नता नांदताना
दुसरीकडे दारिद्र्य, रोगराई थांबताना
मी पाहिले,
श्रीमंत पैशावर लोळताना आणि
पंचपक्वान खाताना
बिचारे गरीब पोटासाठी
वनवन फिरताना
मी पाहिले,
कपडयांंचा ढीग एकीकडे रचताना
दुसरीकडे फाटक्या
कपडयासाठी भटकताना
मी पाहिले,
निवडून येण्यासाठी घोषणांचा आव
आणताना अन् मोठमोठी आव्हाने देेेेताना
मी पाहिले नाही मात्र,
त्या दिलेल्या आव्हानांची
पूर्तता करताना,
अन् समता, ममता, प्रेम व बंधुता
एकत्र नांदताना.
