मी नव्या युगाची नारी
मी नव्या युगाची नारी
मी नव्या युगाची नारी
मी अष्टभूजाधारी-
एका करी,सांभाळील तुझ्या
पवित्र नात्याला... इथे
नको नको रे साजना संशयाला..मी नव्या..।।
दुजा करी विनते घट्ट,
विन रे संसाराची
मनी जाणीव असेल नीत सप्तपदीच्या वचनांची.....मी नव्या.........।।
तिज्या करी घेईल वसा
मातृत्वाच्या मखमली नात्याचा
तुज सवे सांभाळीन कुलदीपक अन काळजाच्या कळीला....मी नव्या...।।
चतुःकरी कर्तव्य बजावेन चारी कर्म
तिर्थरूप सासू-श्वसूर
सेवा करणे हाच मानिल धर्म,श्वास जोवरी
मी नव्या......।।
पंचम करी कास समाजकार्याची थोर
ममसद्बुद्धीने,नवयुक्तीने
नाते बिलोरी जपून राहीन समाजऋणी
मी नव्या युगाची नारी....।।।।
षष्ट करी धरील कास तंत्रज्ञानाची
श्रद्धा-भाव ही जपेल मनी
अंधश्रद्धेला मिटवून,पेटवेल विज्ञानाची चिंगारी
मी नव्या युगाची नारी......।।
सप्तकरी घे तु ही शपथ मंगळसुत्राची
होशील जीवन आरसा,
चूक असो कुणाची वाद नकोच फारसा
कर्तव्याची जाणीव तू ही ठेव मनी...मी नव्या..।।।
अष्टकरी पाऊल माझे पडेल तुझ्या सोबतीने
न होईल गांधारी पट्टीका बांधून
न होईल सिता देऊन चारित्र्य-अग्नीपरीक्षा
मी होईल फक्त फुल्यांची सावित्री,
शिवबा घडविणारी जीजाई अन शिल्पकार
घडविणारी माता रमाई....मी नव्या...।।
मी हीमालय,मी सरीता,मी तृप्त धरणी
मी शिवाला शमवीणारी गंगा मी रिद्धी-सिद्दी
मी तुझ्या जीवनाची क्षितीजावरची रेशमी वाट
मीच तुझ्या श्वासांतरीच्या कस्तूरीगंधाची तुतारी
मी नव्या युगाची नारी..........।।
