मी निर्भया बोलते...
मी निर्भया बोलते...
तुमच्या या कवितेच्या जगात आज मी मला घेऊन आले
तुम्ही कविता लिहिता मनातून पण माझी कैफियतच घुसमटून टाकतेय मलाच आतून...
पण मला मांडायचं आहे स्वतःला तुमच्यासमोर
कारण कोणास ठाऊक मुलींनो तो हैवान कधी येईल तुमच्यासमोर...
आनंदी होते मी माझ्या आई-बाबांच्या कुशीत
पण कधी कळलेच नाही माझाच जीव घेतला जाईल हैवानांच्या कुशीत...
बाबा म्हणायचे, "ये तो बेटी नहीं, अपना बेटा है।"
पण हैवानांनी मजबुर केलं मला, "मै बेटी हुँ, मुझे औकात में रहना है।”
माझ्याच शरीरावर प्रेम करणारी मी
दुसरंच कोणी त्याला वासनेने न्याहाळत होतं
माझी हीच चुक की मी सगळ्या जगाला चांगलंच समजलं होतं...
मेल्यावरही आई-बाबांच्या मनाला होणार्या यातना
मला वरही शांत बसू देत नाही,
मी देवाला विनंती करूनही तो मला न्यायासाठी खाली पाठवत नाही...
अंधाराला सतत घाबरणारी मी आज अंधाराशीच झुंज देत आहे,
माझ्याच आत्म्यासमोर मी माझ्याच गुन्हेगारांना मोकाट फिरताना पाहत आहे...
अहो प्रियंका ताईला आज जरी मिळाला न्याय असं तुम्हाला वाटत असेल,
पण असे लाखो अल्पवयीन -प्रौढ वासनांध हैवान
अजूनही तुमच्याच आजुबाजुला फिरकत असेल
परत एक शिकार करण्यासाठी...
माझ्या बहिणींनो एक सांगेल शेवटी तुम्हाला
न्यायाचा आज जरी आनंद आहे आपल्याला
पण आजुबाजुला वावरताना
स्वतःमधली प्रियंका, निर्भया, अरुणा
सतत मनात असू द्या,
या हैवानांशी प्रतिकार करताना मनाला बळकट करून
चुकीची चाहुल लागताच धैर्याने त्यावर मात करा,
तू दुबळी नाही, त्यांच्याशी दोन हात करण्याची ताकद
तुझ्यातच आहे हे नेहमी लक्षात असू द्या...
