मी नाही किसना
मी नाही किसना
मी नाही किसना!
ह्या काळ्याला सोळा हजार बायका होत्या
घरात बायको म्हणून
तरी ह्याचं भलतंच काहीतरी
फिरत असतो गोपींसंगे रासलीला करीत
मंदिरात दिसतो गोऱ्या राधेला शेजारी घेऊन
तर... मीरा असते ह्याच्या भक्तिभावात दंग
आमचा रंग काळा तरी
नाही एकही कोणी बायको
गोरी मैत्रीण असली तरी नसते ती राधा
कोणी तिला विचारलं तर सांगते
फुकटात मिळालेला 'बाऊंसर' हा माझा
मीरा कोणी असेल का
माझ्या ह्या मैत्रिणींच्या गराड्यात?
आहे तरी ती म्हणते
मी आहे 'गर्लफ्रेंड' फक्त
उडवू दे पैसा त्याला माझ्यावर
शॉपिंग, सिनेमा, खाण्यापिण्यावर मस्त
मैत्रिणींच्या गराड्यात असलो तरी
त्या नसतात गोपी आणि मी नसतो किसना!
त्याचा आणि माझा रंग सारखा
म्हणूनही मी नाही किसना!!
