STORYMIRROR

Sangeeta GodboleJoshi

Others

4  

Sangeeta GodboleJoshi

Others

मी ना अमृता ..

मी ना अमृता ..

1 min
446

अमृतासारखं ..

तुझ्या उघड्या पाठीवर 

मी 'साहिर'लिहिणार नाही .

किंवा तू चहा पिऊन ठेवलेल्या 

कपाला मी ओठही लावणार नाही .

अशरीरी प्रेम ..

वगैरे वगैरे उपाध्यापण लावणार नाही .

मी अमृता नाही अन् तू इमरोज ..

कारण ..माझ्या आयुष्यात ..साहिर नव्हता .


थोडंसं धाडसच हेही म्हणण्याचं .


पण आता हे सगळं 

बदलायला हवं ना?

'मैत्री' च्या व्याख्येचा परीघ  

थोडा रुंदावायला हवा ना?

त्याच त्या रुढी, कल्पना 

आकुंचित वृत्ती ..

सगळं स्वच्छ असून .. 

आक्रसायला होतं .

मनातल्या विचारांना 

अभिव्यक्ती स्वातंत्र्य 

मिळायला हवं ना ?

हे बोलण्याचं 'धाडस'

करतेय मी ..

कारण ..

सखा फक्त 'कृष्ण'च होऊ शकतो ..

असं नाहीये हे उमगलं होतं 

स्वानुभवानं ..

तुझ्या रुपानं सखा मिळाला तेव्हाच ..



Rate this content
Log in