STORYMIRROR

Bharati Sawant

Others

3  

Bharati Sawant

Others

मी कवयित्री अशी झाले

मी कवयित्री अशी झाले

1 min
279

शाळेमध्ये असतानाच

करायचे खूपच वाचन

अलंकारिक शब्दांचेही

व्हायचे मनात संकलन


घरकाम न् अभ्यास चालू

कविता मनी घोळायच्या

शाळेत सरांना दाखवता

नोटीसबोर्डला लागायच्या


अनुभव नि प्रसंगाने नित्य

काव्यलेखन चालू झाले

आईबाबांनी प्रशंसा करता

प्रोत्साहन अंगी मिळाले


कथा कादंबऱ्या वाचता

निबंधलेखन करू लागले

आवडणाऱ्याच ओळींची

टिपणही लिहून काढले


नव्या कवयित्रीची झाली

सुरूवात शालेय जीवनी

बहरला वृक्ष पानफुलांनी

कॉलेजातच मग अजूनी


मधल्या काळात विसरले

स्वत:तल्या कवयित्रीला

वॉटस्अपच्या माध्यमाने

जुळवले या काव्यमैत्रीला



Rate this content
Log in