मी कविता करतो।
मी कविता करतो।
1 min
617
कविता करण्याचा
लागला मला छंद वेगळा।
आठवेना जरी एखादा शब्द
कागदाचा करतो चोळा मोळा।।
चोळा मोळा केलेले
बोळे साचती टेबलाभोवती।
संपती वहीची पाने
न शब्द आठवती।।
वाक्यांची ओढाताण करुनि
डोक्याचा होई भुगा।
शून्यात नजर असे
कोणाला कसे सांगा।।
कविता करण्याचा
बोभाटा होई जरी
कसेतरी यमक जुळती
पटकन उतरवी कागदावरी।।
जुळविण्या यमक
पाही इकडे तिकडे।
हळूच पत्नीला विचारी
शब्द सांग ना गडे।।
वागणे असे वेड्या परी
नाना विचार येई मनी।
शब्द न आठविता तरी
उदास होई मनोमनी।।
झाली माझी कविता
कडवे झाली दोन चार
कोणा आवडो ना आवडो
मला आवडे फार।।
