STORYMIRROR

काव्य चकोर

Others

4  

काव्य चकोर

Others

मी कृष्ण मुरारी नाही

मी कृष्ण मुरारी नाही

1 min
423


तू असशील अवखळ राधा

पण मी तो कृष्ण मुरारी नाही..

तू कोमल स्वर अलगुजाचा

पण ओठी माझ्या बासरी नाही..!!


डोह उरात जरी कालिंदीचा

पण तीरावर ती रंगत नाही..

मेळा गोपाळांचा सभोवती

पण पेंद्या सुदामा त्यात नाही..!!


स्वप्न तलम मोरपीसी नयनी

पण मोरपीस मस्तकी नाही..

अडीज अक्षरांचे हे प्रेम वेडे

पण धडे त्याचे पुस्तकी नाही..!!


कोण देतो दाखले कशाचे

देणेघेणे त्याचे कोणास नाही..

कोण राधा अन् कोण कृष्ण?

भान याचे आता प्रेमास नाही..!!



Rate this content
Log in