मी कोण
मी कोण
1 min
625
कवी हा उघड़ा। कवी हा नागडा
शब्दाची घागर । खाली वर ।।
शब्दांना आकार । शब्दांना ओंकार
शब्द अलंकार । प्रसवितो ।।
शब्दांचे कवित्व । शब्दांचे ममत्व
शब्दाचे महत्व । घरोघरी ।।
कवी हा श्रीमंत । कवी हा सुमंत
कवी हाच राजा । दरबारी ।।
बोलाचीच कढ़ी । बोलाचाच भात
करी काय मात । व्यवहारे ।।
शब्दांचे वजन । शब्दांचे सृजन
शब्द भड़ीमार । पुस्तकात
शब्दांचे मांडव । शब्दांचे तांडव
शब्दांची झालर । अकाशीच
शब्दांनी शब्दांला । मारुनिया गाठ
पाहातोच वाट । प्रकाशक ।।
रामसुत म्हणे । शब्द खुळखुळा
वाजवतो वेळा । संमेलनी ।।
सांगा का शब्दांनी । भरेल हो पोट
कविता करितो । उठसूट ।।
शब्द हे तोरण । करून झुंबर
बांधितो अंबर । साहित्याचे
