मी जराच चुकले होते
मी जराच चुकले होते
1 min
11.6K
मी जराच चुकले होते
मज हिणवायला हे जग
तयारच होते !!
मी दलदलीत फसले होते
फजिती बघवयला हे जग
नुसते उभेच होते !!
एक दिवस कळले होते
मज हिणवणारे हे जगच
बरबटलेले होते!!
दलदलीत जरी मी असले
पाऊल पुढेच होते !!
कुणाच्या तरी मुखावर
शिंतोडे बरेच होते!!
जगास तेव्हा कळले होते
मी पण माणूस होते
चुकणे स्वाभाविक होते!!
