STORYMIRROR

Vivekanand Benade

Others

3  

Vivekanand Benade

Others

मी जरा मोठा होतो

मी जरा मोठा होतो

1 min
180

बस् झालं आता बाळांनो

मी आता मोठा होतो,


सगळं कसं बाळा मी सांगतो

तुम्हाला पण समजावं म्हणून मी धडपडतो,

तुलाच खेळवायला मी लहान होतो

 मजा येऊन तुम्ही हसावं म्हणून मी कोलांटी उडी मारतो


पण बाळा आता बस् झालं...

मी आता जरा मोठा होता !


तुला वाटतय,तस नसतो रे मी ..

मी पण बाहेर असतो मोठा साहेब

साहेबांचं बाळा तुला काय दुःख सांगू

म्हणून तर बाळा घरात तुझ्या पेक्षा लहान होतो


पण बाळा आता बस् झालं

मी आता जरा मोठा होतो


एक एक वार उलटा पडतोय समजतंय की मला

जरासा नाराज होऊ नको का रे मी कोणावर

तुला सांगतो नाही रे उचलता येत हात मोठ्यावर

म्हणून बाळा तूच हात खाली येतोच


पण बाळा आता बस् झालं

मी आता जरा मोठा हितो


कृष्णाचं आता काही राहील नाही तो

दुर्योधनाच्या घरात पाणी भारतोय

हे सार नको कळायला म्हणूनच मी 

जरासा तुमच्या पुढे लहान होतोय


पण बाळा आता बस् झालं

मी आता जरा मोठा होतोय


तू आता मोठा झालास, म्हणून तुला कळू लागलाय..

व्यवहार तुला आता कळू लागलाय 

बाबा आता जरा बारक्या सारखे वागू नका 

कधी तरी मोठे व्हा म्हणू लागलास


म्हणून बाळा आता बस् झाल 

मी आता जरा मोठा होतीय...


Rate this content
Log in