मी धुक्यात वाट पाहताना...
मी धुक्यात वाट पाहताना...
1 min
560
मी धुक्यात वाट पाहताना
धुक्यानेच वाट दाखवली
हाताने हाताला कुरवाळताना
पावलांची थरथर जाणवली
वाटेतल्या अंधाराला कवटाळुन
उजेडाची शाल पांघरली
किर्र करणाऱ्या रस्त्यामधुन
चाचपडतं पावलं चालली
हिरव्या पानांवरच्या दवांनीही
सर्द ओलावली सावली
ही पहाट केशरी उमलताना
काया सुवर्णमय जाहली
तो नितळ आकाशातून पाहताना
चादर धुक्याची किरणात अडकली
मी धुक्यात वाट पाहताना
वाट धुक्याची वाटते वितळली...!!
