STORYMIRROR

Nurjahan Shaikh

Others

3  

Nurjahan Shaikh

Others

मी आणि माझे भविष्य

मी आणि माझे भविष्य

1 min
211

कितीही वाईट दिवस असले 

तरी मला जगायचे आहे,

माझ्या नाजूक कळ्यांना 

उमलताना पाहायचे आहे.....१ 


जरी घाव मनावर बसले

सोसणार मी एका झाडासारखे, 

शेवटच्या क्षणापर्यंत 

लढणार मी माझ्या मनासारखे.....२ 


हिमतीने पुढे पुढे जायचे आहे 

जीवनाचे ध्येय गाठण्यासाठी,

सर्व शक्तीने लढायचे आहे 

उद्दिष्टपूर्ती करण्यासाठी.....३


नको विचार आता कोणाचा 

बस झाले दुसऱ्यांसाठी जगण्याचे,

स्वतः आता ठरवणार आहे 

मीच माझे भविष्य घडवण्याचे.....४



Rate this content
Log in