मी आहे ना....
मी आहे ना....
1 min
701
ती...👸
माझ्या पोटी जन्मली,
पण अंश आहे तुझा,
सारखे सारखे विचारते,
आई,कधी गं येईल बाबा माझा.
विचारते प्रश्न खूप खूप,
आहे न ती तुझच प्रतिरूप,
तुझ्याविषयी बोलताना तिला,
खूपच येतो तिलाही हुरूप.
सारखे गप्प गप्प राहते,
रोजच सांजसकाळी उंबरठ्यावर बसते,
आता येशीलच तू म्हणून वाट पहात असते,
ती तुला खूप खूप मिस करते.
पण तू काळजी नको करू,
मी ठेवतेय तिच्या कडे लक्ष,
तू तुझी जबाबदारी सांभाळ,
रहा देशसेवेसाठी दक्ष....💂
