STORYMIRROR

Vasudha Naik

Others

3  

Vasudha Naik

Others

म्हणींचे काव्य...

म्हणींचे काव्य...

1 min
346

चष्मा आहे डोक्यावर

शोधी चष्मा घरभर

काखेत कळसा गावाला वळसा

असेच झालेय हो नाहीतर...


कधी भांडणे कधी प्रेम

प्रत्येक घरी वाद - संवाद

घरोघरी मातीच्या चुली

साधतोय दोघात सुसंवाद...


मनवा आहे कुटुंबातील

सार्‍यांचीच लाडकी राणी

कितीही समजावा तिला

पालथ्या घड्यावर पाणी...


घर बांधले आजोबांनी

तिथे आरामात मुलगा राहिला

आयत्या बिळात नागोबा

आता नातवाला आयताच वाटा मिळाला...


Rate this content
Log in