महिमा भाज्यांचा
महिमा भाज्यांचा
1 min
337
आठवड्याचा भरला बाजार
भाज्या खाऊन पळवा आजार
ज्यांना मधुमेहाने घेरले
त्यांनी खावे मनसोक्त कारले
लाल पेशी ज्यांच्या कमी
टोमॅटो, बीट वाढवण्याची घेतात हमी
जीवनसत्त्वांचा आहे अभाव
पालक, मेथीवर मारावा ताव
मुळा-कांद्याची हिरवीगार पात
दूर पळवून लावतात पित्त, वात
बटाटा कांद्याची वसती ठाम घरोघरी
वजन वाढवायला मदत करतात भारी
भेंडी, भोपळा आणा अधूनमधून
कॅल्शियमची उणीव निघेल भरून
ठराविक भाज्यांचे प्या सूप
वार्धक्यापासून रहा दूर आयुष्य वाढेल खूप
