महिला
महिला
1 min
289
महिलेत काय असते??
तिच्यात असते ऊर्जा अपरंपार...
स्वतः चंदन होवून झिजण्यात,
तिला मिळतो आनंद अपार...
ती असते लडीवाळ मुलगी...
असते कधी प्रेमळ बहीण...
तिच्यात असते कर्तव्यदक्ष सून
अन् दयासागर होणारी सासूदेखील..!!!
आदर्शवत पत्नी होण्याचे
सारेच असतात तिच्यात गुण...
वात्सल्यसिंधू आई होवून
करुन ठेवते लेकरावर मायेचे ऋण...!!!
