मही माय
मही माय
1 min
7.4K
काय सांगू माय मही
लय गुणाची गुणाची
राही अंगनात उभी
वाट पाहे लेकराची ----- ||
काय सांगू तुज आता
मह्या मायची मी रित
मुखी अमृताची वाणी
सदा गायी मज गीत ----- ||
मह्या मायीच रे मनं
जसं गंगेच हे जलं
किती करू गुणगाणं
नाही होत तिच मोलं ----- ||
सदा मायीची रे मह्या
घरादारात आबळ
नाही घडीचा विसवा
करी सुखानं सांभाळ ----- ||
मह्या मायीच्या सारखी
नाही दिसत रे माय
आठवण उचकिला
रडतो मी धाय धाय ------ ||