महात्मा फुले
महात्मा फुले
1 min
444
ओ क्रांतीबा तुम्हाला क्रांतीबा
की महात्मा म्हणू
गोविंद रावांचे तुम्ही पुत्र
समाजसेवेचे घेऊन सुत्र
थाॅमस पेनांचे पडला
तुमच्यावर समाजसेवेचा
प्रभाव
तुम्ही मिळवून दिला
शिक्षणाचा हमीभाव
समाजसेवेचा घेऊन वसा
रात्रंदिवस तुमच्या ठायी असा
नव्हते हक्क शिक्षणाचे
मोफत मिळवून दिले हक्काचे
पुण्यातील भिडे वाड्यात
शाळा सुरू केली
मांगा महारांच्या पोरांसाठी
सावित्रीबाई ना घेऊन सोबत
स्त्रियांसाठी खुले केले
शिक्षणाचे द्वार
तेंव्हाच शिकू लागले मांग अन् महार
