महाराष्ट्राची संस्कृती
महाराष्ट्राची संस्कृती
1 min
158
असे न्यारी, जगात भारी
संस्कृती महाराष्ट्राची......
इथे कवणे, पोवाडे, लावणी
दिसे झलक आगळी साहित्याची
नाकात नथ अन्
नेसुनी पैठणी भरजरी
शोभते जणू अप्सरा
प्रत्येक ललना सुंदरी
एकत्र येते घरदार
करण्या साजरे सणवार
संस्कृती, परंपरा जपती
करुनी साज- शृंगार
महाराष्ट्र असे भूमी
संत, महात्मा, हुतात्म्याची
दिले बलिदान, त्यागले प्राण
ही भूमी असे महात्म्याची
असे आगळी, असे वेगळी
संस्कृती महाराष्ट्राची
माय मराठी, असे मराठी
महती मराठी भाषेची
