महाराष्ट्राची संस्कृती
महाराष्ट्राची संस्कृती
प्रदेश वेगळा
वेगळ्या परंपरा
तरी महाराष्ट्र देश माझा
घर्म वेगळा रितीरिवाजही वेगळा
तरीही महाराष्ट्र देश माझा
याच मातीनं घडविले आणि
या मातीशी एकरूप झालेही
तरीही महाराष्ट्र देश माझा
इथेच झाली तुक्याची गाथा
आणि ज्ञान्याची ज्ञानेश्वरी
त्यांनी दाखवला मार्ग भक्तीसाधनेचा नामसाधनेचा
इथली संगिताचीही पंरपरा काहीशी वेगळीच
मग असो वाघ्या मुरळीच्यानाचात
नाहीतर तो कुडमुड्या जोशी
आमच्या लावणी न् पोवाड्यानी तर
उडवलेत कैकांचे कैकदा फेटे
महत्त्व असे आमुच्या पेहरावास
मग तो आमचा फेटा वा असे नाकातली नथ
नऊवार साडीला तर दिसे ती काहीशी खासच
दिसते आमची संस्कृती
आमच्या टिळक आगरकरांच्या आचारा विचारांत
आमच्या सावरकर राजगुरुच्या त्यागात
आमची संस्कृती म्हणजेच फुले आंबेडकर
आमची संस्कृती निधड्या सह्याद्रीच्या छातीची
आमची संस्कृती म्हणजेच महाराष्ट्राची संस्कृती
