STORYMIRROR

SAMPADA DESHPANDE

Others

3  

SAMPADA DESHPANDE

Others

महाराष्ट्राची महती (पोवाडा)

महाराष्ट्राची महती (पोवाडा)

1 min
275

आधी नमन गणरायाला,

करवीरनिवासिनी आंबाबाईला , खंडेरायाला

ज्योतिबाला, मराठी मातीला, राजा शिवबाला

सवे द्यावे आशिर्वादाला , तुम्हा घेऊन बघा संगती

सांगते महाराष्ट्राची महती

सांगते महाराष्ट्रची महती हो जी जी ............. 

एक मे १९६० बांधली गेली खूणगाठ

जन्माला बाळ येणार , जगती महान होणार

बाळ जन्माला येई सवे घेऊन बहीण मुंबई

जाहली एक बघा घाई, खूष जाहली भारत आई

सागर बाबा पाळणा जी गाती सांगती महाराष्ट्राची महती 

सांगती महाराष्ट्राची महती हो जी जी................. 

मुखमंत्री पहिले झाले यशवंतराव चव्हाण हो भले

महाराष्ट्राला पुढे बघा नेले नाव जगती मोठे केले

महान बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी दिला घटनेला आकार

कपिल देव , तेंडुलकर , खेळाडू महान सर्वत्र पसरवती कीर्ती

म्या सांगू एका मुखी किती माझ्या महाराष्ट्राची महती

माझ्या महाराष्ट्राची महती हो जी जी................. 

बाळ टिळक, सावरकर, बिपीनचंद्र पाल, आगरकर

स्वातंत्र्यवीर हो थोर महाराष्ट्राची महान लेकरं 

नावे घ्यावी अहो कुठवर मांडला स्वातंत्र्याचा जागर

भारतमातेस स्वतंत्र करण्या तुरुंवास हे भोगिती

वंदुनी त्यांची देशभक्ती सांगते महाराष्ट्राची महती

सांगते महाराष्ट्राची महती हो जी जी................. 

कापड ,रेशीम अन साखर सर्व उद्योगांत अग्रेसर 

असो कृषी वा विदेशी गुंवणूक दावी बुद्धीची चुणूक  

उपजते बुद्धिवंत इथली तांबडी माती 

लावुनी माझ्या भाळावरती सांगते महाराष्ट्राची महती

सांगते महाराष्ट्राची महती हो जी जी.................

गावे महाराष्ट्राची शोभा जणू फणसाचा गोड बघा गाभा

सिंचन प्रकल्प येई धरतीचा स्वर्ग होऊन जाई

कष्टाची फळे हो मिळती शेतकरी आनंदी होती 

घेऊन बळीराजाला संगती गाते महाराष्ट्राची महती 

गाते महाराष्ट्राची महती हो जी जी................. 

स्त्री पुरुष भेद इथे नाही सर्व क्षेत्रात पुढे पुढे जाई 

उद्योग, शिक्षण, रोजगार सर्वांना समान अधिकार 

मग असो कृषी सहकार किंवा माहितीचा अधिकार 

दाही दिशा बघा गाती माझ्या महाराष्ट्राची महती 

माझ्या महाराष्ट्राची महती हो जी जी................. 

भाग्यवान मी लोकहो 

जन्मले महाराष्ट्राच्या भूमी 

मागणे मागते गणरायाला 

यावे इथेच जन्मोजन्मी शाहीर संपदा सांगे श्रोत्यांप्रती

माझ्या महाराष्ट्राची महती 

माझ्या महाराष्ट्राची महती हो जी जी .................

----------------------------------------------------------------------------------------------------------


Rate this content
Log in