STORYMIRROR

अमोल धों सुर्यवंशी

Others

4  

अमोल धों सुर्यवंशी

Others

महाराष्ट्राची दौलत.

महाराष्ट्राची दौलत.

1 min
115

मोठेपणांचे स्थान किल्ले

पिकनिकचे स्थळ किल्ले

राजकारणांचे बळ किल्ले

कचरांचे घर किल्ले

तिथे कित्येक मावळ्यांचे

रक्त वाहिले.

जाण आहे का? रे..

म्हणे मराठ मोळे.

किल्लांसाठी मावळे आपुले

झुंजले अमर झाले गडावर

दफन झाले.

भगवा हातात घेऊन

गलिच्छाचे शिर तोडीले

मैलो मैल चालून

गड किल्ले जिंकले

छत्रपती शिवरायांनी

गड संकल्पनेने

स्वराज्य रक्षिले..

मंदिर आहे माझ्या

राजाचे किल्ले

नाही जपले तर

मराठी कसले....

महाराष्ट्राची खरी

दौलत गड किल्ले. ..


Rate this content
Log in