महाराष्ट्र माऊली
महाराष्ट्र माऊली
महाराष्ट्राच्या मातीत जन्मलो, पुणित जाहले पाय
स्वर्गाहूनी सुंदर अमुची, मराठमोळी माय ॥ धृ॥
तुझ्या पोटी जन्म घेतला
मानव जन्म सार्थक जाहला
अजरामर झाले हे जीवन
याहूनी भाग्य दुसरे काय...१
इथे एकतेची शान निराळी
वीरत्वाची भरते शहाळी
वारकऱ्यांचा मृदुंग गर्जतो
सावळा विठुराय... २
स्त्री शिक्षणाचा उगम इथेचि
साहित्यामध्ये दिशा उषेची
जातीच्या बेड्या तुटल्या
शलाका जाहल्या निरुपाय... ३
अमुची सुंदर मधाळ बोली
हृदया संगे हृदये जोडी
मैत्रीची माळ गुंफीते
दुधा वरची साय... ४
मानवतेचा अभिनव पाया
अन्नदात्री सुपीक काया
शब्दं वर्णाया उणे पडती
करू कोणता उपाय... ५
