महाराष्ट्र माझा
महाराष्ट्र माझा


विविधतेत एकता मंत्रच महान
माझा महाराष्ट्र माझा स्वाभिमान
विचार क्रांतीचा अनमोल ठेवा
पावन भुमातेचा वाटे अभिमान
अद्भुत समाजप्रबोधनाची गाथा
ऐतिहासिक,प्रेरणादायी वारसा
कर्मठ रूढी परंपरांना हाकलून
दावी अंतर्बाह्य प्रगतीचा आरसा
सावित्री,लक्ष्मीबाई नि जिजाऊ
शिवराय,शाहू, फुले,आंबेडकर
समानतेचे,मानवतेचे वाहते वारे
मातीमोल झाले अज्ञानतेचे घर
नद्या,पर्वतरांगा,सागरी किनारा
मंदिरे,किल्ले नि वास्तूंचा पहारा
आचार,विचार,आहार संपन्नता
होतो सहा ऋतूंचा सण साजरा
पशू पक्षी नि वनराईंनी नटलेला
माय मराठीचा शिलेदार मावळा
ओवी,किर्तनाचा साज निराळा
चैत्र पौर्णिमेचा सुगंधित सोहळा
ओला कोरडा दुष्काळ पडला
जीवनप्रवास कधीच न थांबला
जय जवान जय किसान' नारा
संकटांशी सदा धैर्यानेच लढला
संगीत, विज्ञान, क्रीडा राजकीय
महाराष्ट्रीयांची उंच गगनभरारी
पाळंमुळं मातीशीच प्रामाणिक
तारकापल्याड ही नजर करारी