STORYMIRROR

Sailee Rane

Others

4  

Sailee Rane

Others

महाराष्ट्र माझा

महाराष्ट्र माझा

1 min
169

माझ्या महाराष्ट्राचे गं

किती गाऊ गुणगान

किती जाती अन् धर्म

उभा डौलाने घेऊन


माझा महाराष्ट्र आहे

जन्मभूमी या संतांची

ज्यांनी दिली शिकवण

दया क्षमा व शांतीची


माझ्या राज्याची संस्कृती

खूप थोर व पवित्र

जिने घडविले संत

अन् महान चरित्र


महाराष्ट्र माझा आहे

साऱ्या राज्यात महान

नाही भेदभाव कधी

कोणी किती थोर सान


शान मराठी मातीची

वागा भान ओ ठेवून

करू नावाचे सार्थक

तिचे गीत ओ गाऊन


Rate this content
Log in