महाराष्ट्र माझा
महाराष्ट्र माझा
महाराष्ट्र माझा
छत्रपती शिवाजी महाराजांचा
चौदाव्या वर्षी ज्यांनी मुघलांना
हरवून हिंदवी स्वराज्य स्थापन केले त्या सिंहांचा आणि माझ्या रक्तरंजित मावळ्यांच्या.
महाराष्ट्र माझा
माजलेल्या अफजलाच्या कोथळा
काढून,शहीस्त्याची बोटे छाटून टाकणाऱ्या,स्त्रीला देवी ची उपमा देणाऱ्या शिव छत्रपतींचा .
महाराष्ट्र माझा
चाळीस दिवस देहाला यातना देऊनही ताठ मानेने मृत्यू शी झुंज देणाऱ्या आणि मृत्युला
कवटळणाऱ्या सिंहांच्या छाव्या चा म्हणजेच आपल्या छत्रपती शंभु बाळाचा.
महाराष्ट्र माझा
तुटलेल्या हाताला शाल गुंडाळून
लढणाऱ्या अन लढता लढता
प्राणांची बाजी देणारा आपल्या
श्री तान्हाजी मऊसरे यांचा.
महाराष्ट्र माझा
छत्रपती संभाजी महाराजांच्या
मृत्यू मुळे चवताळलेल्या
त्यांच्या मृत्यूचा बदला घेणाऱ्या
शूर संताजी अन् धनाजी घोरपडे
यांचा.
महाराष्ट्र माझा
मृत्यूची टांगती तलवार डोक्यावर असताना
ताज मध्ये दहशत वाद्यांची चार हात करून
त्यांना अटकाव करणाऱ्या शूरवीर श्री विश्वास नांगरे पाटील यांचा.
>
महाराष्ट्र माझा
ड्युटी संपऊन घरी परतणाऱ्या
अचानक आलेल्या संकटाला
पुन्हा सज्ज होऊन तोंड देण्यासाठी देशासाठी सामोरी
जाणाऱ्या श्री अशोक कामटे यांचा.
महाराष्ट्र माझा
ज्या तुटपुंज्या समग्रिनिशी
शत्रूवर तुटून पडले अन्
प्राण गमावले त्या श्री शशांक शिंदे अन् श्री विजय साळसकर
यांचा
महाराष्ट्र माझा
९३ ची मुंबई दंगल ची हानी
दाउत सारख्या नीच गुंडांना ना घाबरता २५ वर्ष केस लढून फासावर चढवणार वकील
श्री उज्वल निकम यांचा
महाराष्ट्र माझा
अमेरिकेने महासंगणक बनवणार
हे आव्हान स्वीकारून हिंदुस्तानात महासंगणक तयार करणाऱ्या महान डॉक्टर श्री विजय भटकर यांचा.
महाराष्ट्र माझा
हिंदुस्तानात महाराष्ट्राला
पहिले ऑलंम्पिक मधील
पदक जिंकून देणाऱ्या
श्री खाशाबा जाधव यांचा
महाराष्ट्र कुणाचा
पानिपतात हरून सुद्धा
प्रत्येक हिंदूंच्या ह्रदयात स्थान मिळवणारा आणि नावापुढे द ग्रेट लावणाऱ्या मराठी माणूस यांचा
महाराष्ट्र माझा
महाराष्ट्र जिजाऊचा, जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे ,हर हर महादेव......