STORYMIRROR

Deepa Vankudre

Others

3  

Deepa Vankudre

Others

महाराष्ट्र दिन

महाराष्ट्र दिन

1 min
11.5K

महाराष्ट्र देशा तुझा, डंका वाजे चोहिकडे,

गगन झाले केशरी, दुमदुमले चौघडे||धृ||


जिजाऊ आशिष देेेेता, सूूर्य नवा उगवला,

शिवबाने स्वराज्याचा, झेंडा भगवा रोवला,

'जय भवानी' गर्जती, सह्याद्रीचे उंच कडे,

गगन झाले केशरी, दुमदुमले चौघडे||१||


कुंकू, नथ, डोरल्याने सजे मराठी देखणी,

संस्काराचे बीज रूजवते संतांची लेखणी,

बलिदानाच्या रक्ताचे ही पडले होते सडे,

गगन झाले केशरी, दुमदुमले चौघडे||२||


वर्धापन साठावा, उत्सव साजरा करूया,

महा राज्य हे एक झाले तो दिवस स्मरूया,

तुताऱ्यांच्या ललकारीने आज सलामी घडे,

गगन झाले केशरी, दुमदुमले चौघडे||३||


Rate this content
Log in