महाराष्ट्र असे राज्य आमुचे
महाराष्ट्र असे राज्य आमुचे
रांगडे असे रुप सह्याद्रीचे
आभूषण तयावरी गडकिल्ल्यांचे
साक्षीदार ते शिवपराक्रमाचे
महाराष्ट्र असे राज्य आमुचे
ह्या मातीवर संस्कार संतांचे
विठ्ठल दैवत आम्हा वारकर्यांचे
विलोभनीय अनुभव पंढरीच्या वारीचे
महाराष्ट्र असे राज्य आमुचे
आठवावे रुप छत्रपती शिवरायांचे
स्वप्न केले साकार हिंदवी स्वराज्याचे
जन्मलो या मातीत, संचित पूर्वजन्माचे
महाराष्ट्र असे राज्य आमुचे
करुया स्मरण सावरकर, लोकमान्यांचे
नेत्रुत्व केले त्यांनी स्वातंत्र्य चळवळीचे
जहालतेने पेटवले स्वप्न स्वातंत्र्याचे
महाराष्ट्र असे राज्य आमुचे
