STORYMIRROR

Manisha Awekar

Others

3  

Manisha Awekar

Others

महामारी

महामारी

1 min
164

काव्यप्रकार  अष्टाक्षरी


साथ देत एकमेकां

जीणं टुकीचं चाललं

पोरं गेली दूरवर

एकमेकां सांभाळलं    (१)


कोरोनाची महामारी

धनी पडलं आजारी

सेवा दिन रात करी

देवा तूच कृपा करी     (२)


नाही उघडलं डोळं

आज सकाळपासून

घोर लागला मनाला

वाट नर्सची बघून       (३)


दवापाणी चालू हाये

बरा व्हायचा तो कधी?

कधी ताप हटायचा?

शंका येते मनामधी     (४)  


करी मन शांत स्थिर

विनविते मनोभावे

औक्ष माझिया धन्याला

देवा उदंड लाभावे    (५)


साहित्याला गुण द्या
लॉग इन